जळगांव जामोद – महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या नगरपरिषद च्या नगराध्यक्षपदासाठी चे आरक्षण आज दी . ६ / १० / २०२५ रोजी जाहीर करण्यात आले . यामध्ये जळगांव जामोद नगराध्यक्ष पद हे अनुसुचीत जाती साठी राखीव झाल्याने . जळगाव जामोद शहरात तसेच तालुक्यात राजकारणी आपआपल्या पक्षाचा उमेदवार कोन असेल . याचे गणीत मांडत आहेत . मात्र सर्वच पक्ष हे नवीन चेहऱ्याना संधी देतात की जुन्यांवर विश्वास ठेवतात . हे आता तरी सांगणे कठीण आहे . मात्र ही नगराध्यक्ष पदाची निवडणक अटी तटीची झाल्याशीवाय राहणार नाही हे विषेश .




