जळगांव जामोद ( अनिल हेलोडे ) – स्थानिक भीमनगर येथे दि . १ / १ / २०२६ रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी प्रभागामधुन निवडून आलेले नवनिर्वाचीत नगर सेवक सुनिल भाऊ रघुवंशी व सौ . वैशाली निलेश तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . पुढील कार्यक्रम बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली . त्यानंतर भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या युद्धात २८ हजार पेशव्यांना ठार करुण त्या युद्धात १४० महार योध्दे शहीद झाले त्यांना आदरांजली वाहण्यात आली . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश तायडे राहुल तायडे प्रविण तायडे निलेश तायडे कुनाल तायडे राहुल जाधव सुमेध अरदळे व भीम नगर मधील सर्व बौद्ध उपासक उपासीका व तुरुण मित्र मंडळांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला . सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन गौतम अरदळे यांनी केले .





