जळगांव जामोद – ( अनिल हेलोडे ) दिनांक 28 /10 / 2025 वार मंगळवार रोजी वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय जळगाव जामोद येथे जिल्हाध्यक्ष देवा भाऊ हिवराळे यांच्या आदेशानुसारआणि तालुकाध्यक्ष रमेशभाऊ नाईक यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न झाली . या आढाव बैठकीमध्ये विविध पदाधिकारी यांनी आपापली मते नोंदविली.सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मी फक्त आणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठीच काम करणार या भावनेने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतील अशी सर्वांनी ग्वाही दिली.
या आढावा बैठीकेचे अध्यक्ष स्थान तालुका अध्यक्ष रमेश नाईक यांनी भूषविले.बैठकीचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते रामकृष्ण तायडे,ज्येष्ठ नेते बाबुराव तायडे हे होते.
या बैठकीत तालुकाध्यक्ष रमेश नाईक,तालुका सचिव साहेबराव भगत,तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई,युवा तालुकाध्यक्ष राजरत्न वाकोडे,शहराध्यक्ष आझम कुरेशी,युवा शहराध्यक्ष प्रवीण तायडे,ज्येष्ठ नेते,रामकृष्ण तायडे,ज्येष्ठ बाबुराव तायडे,जी सदस्य स्वप्निल गवई,भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर, जिल्हा सचिव रविभाऊ नाईक, ऍड संदीप उगले,तालुका महासचिव भागवत वाघ,तालुका उपाध्यक्ष प्रमोद कोकाटे,तालुका उपाध्यक्ष राजू तायडे,तालुका सचिव सुभाष शिरसाट,जयकुमार डोंगरदिवे,तालुका उपाध्यक्ष अस्मत खान,प्रमोद मोरखडे,देवा दामोदर,सुपडा बांगर,ज्ञानेश्वर कोकाटे,दामू सपकाळ,सुदाम गवई,भास्कर जुंबळे,विजय सातव,तालुका उपाध्यक्ष दिलीप तायडे,सचिन पवार,प्रशांत शेगोकार,संतोष तिजारे,अशोक दाभाडे,बाळू तायडे,आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.







