निंबा फाट्यावरून गावी भांबेरीला येण्यासाठी बसमध्ये मी गर्दीतून पुढे जात असतांना एका सिट वर बसलेली मुलगी म्हणाली काका इथे बसा मी तुमच्या साठीच जागा राखून ठेवली . तिला पाहताच माझ्या तोंडून आश्चर्याने ‘ अरे बेटा तू ‘ काय कसे काय? कुठे चालली ? मस्त आनंदात आहेस का? असे मी सिटवर बसता बसता घाईघाईत विचारलं . तिने मस्त आनंदात आहे . तुम्ही कसे आहात ? मी पण मी आनंदात आहे . सिटवर बसल्या वर लोकं मला न्याहाळत असल्याचा भास झाला . सदर तरुणी माझ्या गावच्या नात्यानं भावाची मुलगी होती . ठेंगणा बांधा ‘ रंग सावळा.नजर करारी ‘ मस्त गोल चेहरा रेखीव एकंदरीत तिच सौंदर्य वाखाणण्याजोग . तिचं नाव सुमन .तेवढयात कंडक्टर तिकीट घेण्याच विचारताच मी तिकीट देण्या विषयी खिशात पैशासाठी हात घालताच तिने तुमचंही तिकीट काढलं काका . असे मला म्हणताच खिडकीतून एका तरुणानं बाहेरून दोन टिकीटे दिली . ती मला म्हणाली तुम्हाला मी अगोदरच पाहिल होते . एव्हाना एसटी सडकेवरून धाऊ लागली . मी पुन्हा सुमनला विचारलं आज कोठे चालली ? तिने एका नातेवायीका कडे जाते असे सांगितले . मी विचारले भांबेरीला चालत नाही का ? तेव्हा ती थोड्या उच्च आवाजात म्हणाली ‘ काका आता मी चालते तुमच्या घरी ‘ फक्त त्यावेळीच नाही चालली . आता ती संकटाची वेळ गेली निघून . आता सोन्याच्या अंगठ्या ही चालतात माझ्या तुमच्या बोटात . कोठून येतात कशा येतात आता विचारत नाही . त्या वेळेस तुमच नाक नकटं होऊ नये म्हणून तुम्ही मला नागपूरच्या रेल्वेत बसून सोडून दिले . तसे तर मी तुमची इज्जत गमावली म्हणून तुम्ही मला जीवे मारण्याच्या प्रयत्नात होते परंतु तुम्ही तसं केलं नाही . माझा जीव तुमच्या हातून वाचला म्हणून मी रेल्वेत बसून नागपूरात उतरले . माझ्या पोटात तीन चार महिन्याचा जीव होता माझा पाय चुकून वाकडा पडला माझ्या तरुणपणाच्या न कळत्या वयात त्याची तुम्ही मायबाप एवढी क्रूर सजा देत होते . आता ती बोलत होती अन् मी मुकाट्याने खाली मान घालून ऐकत होतो . ती तिच्या मायबापानं तिला अशा प्रसंगी समजून न घेता तिला घराबाहेर काढून जिवे मारण्याच्या साठी रेल्वेत सोडून दिल्यामुळे ती माझ्याशी बोलत बाप म्हणून तिच्या बापाऐवजी मलाच बोलत होती . ती माझ्यासमोर बोलून मन मोकळ करीत होती शेजारील प्रवाशी ऐकत आहेत त्याचे तीला काही देणं घेणं नव्हतच . तीचा बोलण्याचा आवेग मला आवरताही येत नव्हता . तारुण्यात तिच्या हातून झालेली चूक दुरुस्ता करण्यासाठी निसर्गाने तिच्या हातात काहीच ठेवले नव्हते तरीही त्याची जीवघेणा प्रसंगातून ती गेली असल्यामुळे ती तिची आपबिती सांगत होती . ती पुढे म्हणाली काका मी नागपुरात उतरली मला भूक सतावू लागली म्हणून मी नागपुरातल्या हॉटेल समोर जाऊन भिक मांगू लागली . एका हॉटेल मालकाला माझी दया आली त्याने मला दोन आलुवडे दिलेत . आता माझ्या जिवावरचे संकट टळले आहे असे हायसे वाटून ते दोन आलुवडे खाऊन टाकले . तिथेच दोन गिलास गटागटा पाणी पिलो आणि त्याच हॉटेल बाहेर एका ठिकाणी बसले असता मला गाढ झोप लागली . कोणीतरी माझ्या अंगावर जुनं पुरानं पांघरूण टाकले हे मला दुसऱ्या दिवशी जागी झाल्यावर समजले . आता मी सराईत भिकाऱ्या सारखी पोटाची भूक भागवू लागली दिवसागणीक दिवस जाऊ लागले माझ्या पोटात बाळ वाढू लागले . पावसाळा सुरू असतांना धो धो पाऊस पडत असतांना माझ्या प्रसव वेदना सुरू झाल्यात मी पुर्णपणे ओली झाली होती . दुदैवाने येणारे जाणारे लोक मला पाहून नजर वळवून जात होते . एक चेहरा मला ओळखीचा वाटला मी त्यांना काका हो मला वाचवा म्हणून आवाज दिला परंतु त्यांनी मला न ओळखल्या सारखा चेहरा करून जाऊ लागले . मी पुन्हा त्यांना गयावया करत तुम्ही मला ओळखत नाही का मी ss ह्यांची मुलगी . पण त्यांनी आपली कॉलनीमध्ये इज्जत जाईल म्हणून तेथून हाकलून दिले . ते नौकरी करीत होते . माझ्या वेदना मला असहय होऊ लागल्यात शेवटी पावसात मी एका मुलीला जन्म दिला . सोसायटीतल्या बायांनी मला कापडे दिलीत काही महिलांनी मला खायला दिले . पोटातून माझी ह्याही जीवघेण्या प्रसंगातून सुटका झाली आणि आता मला जगण्याच बळ आल . आता मी एकटी नव्हते . माझ्या जवळ दुसरा जीव सोबतीला होता . त्याच्याबरोबर माझा दिवस मस्त जात होता . बाळ दिवसे दिवस हसू खेळू लागलं . एके दिवशी मला एक ख्रिश्चन मानूस भेटला आणि त्याने माझ्या बाळाला पालन पोषणाची हमी दिल्यामुळे मी माझे काळजाचा तुकडा त्यांच्या हवाली केला . आत्त माझे जीवन बदलू लागले . मी नागपूर ते मुंबई पर्यंत माझ्या तारुण्याच्या भरवशावर फिरू लागले . आता माझ्या हातात पैसा खेळू लागला . पैसा आहे काका तो . आता कसे माझ्या कडे येता अन् माझ्याकडून पैसे घेऊन तुमच्या अडचणी भागवता . अचानक एसटी थांबली माझे उतरण्याचे ठिकाण आल्यामुळे मला सुमनचा निरोप घ्यावा लागला . निघता निघता ती मोठया आवाजात म्हणाली ‘ काका माझं लग्न एका निराधार पोरासोबत जुळलं तुम्ही लग्नाला या जरूर या .


