जळगांव जामोद – (अनिल हेलोडे ) स्थानिक जळगांव जामोद येथील रहीवाशी सध्या धानोरा येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले श्री . विजय ढगे यांना महाराष्ट्र शासनाने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले विजय ढगे हे एक कतव्यदक्ष अधिकारी असुन त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही ते ज्याही ग्रामपंचायता कार्यरत होते त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण केली . गावातल सर्व जातीधर्माच्या लोकांची कामे काही आहेतेड न करता पूर्ण केली त्यांच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाने आदर्श ग्रामसेव पुरस्कार दिला त्या बद्दल सर्वल स्तरातुन विजय ढगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .




