जळगांव जामोद – आज दी . २६ / १० / २०२५ रोजी जळगाव जामोद शहराच्या सौंदर्यात आणखी एक आकर्षक आणि सांस्कृतिक भर घालणाऱ्या संत तुकाराम महाराज चौकातील भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण संपन्न झाले.
संत तुकाराम महाराज यांच्या भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि समाजाला दिशा देणाऱ्या कीर्तन परंपरेची प्रेरणा घेऊन निर्मित झालेल्या या प्रवेशद्वारामुळे शहराची ओळख अधिक उज्वल झाली आहे.
“ज्ञान, भक्ति, सेवा आणि सद्भावना यांचा वारसा जपणारा हा चौक आता शहराचा अभिमान ठरला आहे.” जळगांव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ . संजयभाऊ कुटे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज चौक प्रेवेशव्दाराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी सुरज जाधव डॉ कीशोर केला सचीन देशमुख संजय पांडव संजय धुळे बंडुभाऊ पाटील बाळु पाटील कैलास पाटील निलेश शर्मा संजय भुजबळ इत्यादी सह भाजपा व सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनप्रा गोटेचा सर यांनी केले . यावेळी परिसरातील अनेक नागरीक उपस्थित होते .
.





