
जळगांव जामोद शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा !
जळगांव जामोद – शहरामध्ये आज दी. २ /१० / २०१५ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अनेक मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . तसेच एकता नगर . गौतम नगर भीम नगर शिद्धार्थ नगर पंचशील नगर येथे शहरातील सर्व उपासक उपासीका यांनी त्रिशरण पंचशील घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले .





