मलकापुर – तालुक्यातील ग्राम दाताळा येथील पंचशील नगर मध्ये गावाच्या समस्या संधर्भात मलकापूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अजय प्रभाकर सावळे यांचे नेतृत्वात स्थानिक बुद्ध विहारात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी प्रामुख्याने महासचिव भीमराव नितुने व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते अन्वर शहा उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्राम दाताळा येथील पंचशील नगरातील सर्व जातीय धर्मांचा घरकुलाचा प्रश्न ऐरणीवर आहे. या संदर्भात घरकुलग्रस्त बांधवांनी वंचित बहुजन आघाडी स्थानिक नेते अजय बावस्कर आणि सतीष सावळे यांच्याशी संपर्क साधला. स्थानिक नेतृत्वाने आज भर दिवाळीच्या दिवशी लोकांच्या समस्येबाबत पंचशील नगरात बैठकीचे आयोजन केले. यावेळी सर्व घरकुलग्रस्त नागरिकांनी आपले आपबिती वंचित बहुजन आघाडीचे नेत्यांसमोर मांडली. त्यांच्या घरकुलाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. आणि माननीय पंतप्रधान यांनी मागील त्याला घर देण्याचा संकल्प केला असला तरीही स्थानिक प्रशासनातील ग्रामसेवक हे येथील नागरिकांच्या समस्या जाणून न घेता त्यांच्या घरकुलाचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत आहे असा स्थानिक नागरिकांनी आरोप केला. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण नगरात फिरून समस्येचा आढावा घेतला आणि घरकुलाचा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीच्या वेळी प्रामुख्याने संजय सावकारे ,गणेश सावकारे ,गणेश तायडे, सुभाष तायडे, गजानन सोनवणे ,गजानन वाढे ,कल्पना सावकारे ,शोभा सावकारे ,सागराबाई सावकारे, नारायण तांदळे, मालती तांदळे, पुंजाजी जगदेव सोनवणे, गजानन शंकर देवकर ,भास्कर तायडे ,अर्जुन सोनवणे, पांडुरंग सुखदेव बावस्कर, वसंता बावस्कर, जुने द शहा ,पुंजाजी सोनवणे, शेख आरिफ ,कल्पना तायडे, सुपडाबाई तायडे ,अंजुन बी शहा, वैदवी शहा ,संगीता देवकर ,आशा तायडे, गजानन देवकर, लक्ष्मी बावस्कार, निलेश सोनवणे, इंदुबाई सोनवणे, महादेव बावस्कर ,सुनिता बावस्कर, सलीम शाह ,संतोष धुरंदर ,भाऊराव धुरंदर ,संजय बावस्कर ,सायाबाई सोनवणे ,संगीता देवकर, शेख फैयाज, कस्तुराबाई तायडे, प्रमोद देविदास ,संदीप धोर धर,सविता तायडे, आणि मधुकर सोनवणे इत्यादी सर्व जाती धर्माचे गावकरी उपस्थित होते.




