जळगाव जा. – भारतीय संस्कृतीत भक्तिमार्गात चातुर्मासाचे अनन्य साधारण महत्त्व आहे समर्थ रामदास स्वामी संप्रदायात गुरुपरंपरेनुसार ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर श्री रामानंद महाराज जालना श्री प्रल्हाद महाराज साखरखेर्डा यांचे पट शिष्य श्री हरी महाराज लेनेकर श्रीक्षेत्र माकोडी तालुका मोताळा यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चातुर्मास समाप्ती सोहळ्याचे आयोजन केले आहे तीन दिवसीय 13 कोटी राम नाम जप यज्ञ पूर्णाहुती भजन कीर्तन उपासना हरिपाठ इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन 1 नोव्हेंबर पासून 3 नोव्हेंबर पर्यंत आहे या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणाहून पालखी यात्रा व पायी वारीचे नियोजन भक्त मंडळी करतात जळगाव जामोद ते श्रीक्षेत्र धूपेश्वर माकोडी पालखीत विविध दर्शनीय स्थळे असून पालखीचे हे 23 वर्ष आहे रस्त्याने भजने अभंग गौळणी भारुड गात वैष्णवी नृत्य करीत भाविक हरीनामाचा आनंद लुटतात पालखी प्रस्थान श्रीराम मंदिर अयोध्या नगर जळगाव येथून दिनांक 30 ऑक्टोंबर गुरुवारी तीन वाजता नगर प्रदक्षिणेसाठी निघत असून चौभारा ओंकारेश्वर मंदिर सिनेमा रोड दुर्गा चौक राजा भर्तृहरी नाथांचे दर्शन घेऊन श्री गजानन महाराज मंदिर योगीराज नगर येथे मुक्कामी राहील दिनांक 31 ऑक्टोबर शुक्रवारी पहाटे काकड आरती नंतर पालखी श्रीक्षेत्र धानोरा कडे प्रस्थान होईल श्री महासिद्ध महाराजांचे दर्शन पळशी सुपो येथे श्री सुपो महाराजांचे दर्शन घेऊन श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचे दर्शन व अंबिका भवानी माता मंदिर शिन फाटा येथे पालखी मुक्काम आहे तेथे रात्री ह भ प सुदाम महाराज पाटील नाव खुर्द यांचे हरिकीर्तन राहील दिनांक 1नोव्हेंबर शनिवारी तालखेड मार्गे श्री संत बहिरीनाथ स्वामी मंदिर भोट येथे दर्शन, प्रिंप्राळा येथे छोटा हनुमान दर्शन व श्री धुपेश्वरांचे दर्शन घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पान्हेरा येथे पालखी मुक्काम आहे रात्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज बावस्कर खांडवी यांचे हरिकीर्तन आहे दिनांक 2 नोव्हेंबर रविवारी घिरणी बेलाड येथे श्री गजानन महाराज मंदिर दर्शन दाताळा येथे सात बळेश्वर शिवदर्शन आहे दाभाडी मार्गे श्रीक्षेत्र माकोडी येथे चैतन्य मंदिरात पालखी मुक्कामी पोहोचेल रात्री ह भ प गजानन महाराज गायकवाड बुलढाणा यांचे हरी किर्तन आहे दिनांक 3 नोव्हेंबर सोमवारी श्रीहरी महाराज दर्शन प्रवचन होमह वन पूर्णाहुती महाप्रसाद कार्यक्रमात भाविक भक्त सहभागी होऊन त्याच दिवशी वाहनाने पालखी जळगावला परत येईल पालखीत सहभागी होणाऱ्या भाविक बंधू-भगिनींनी नियमावली वाचून आपली नावे श्रीराम उपासना मंडळ आयोजन समितीचे श्री भगवान भाऊ अतकरे मो न.7767945497 प्रमोद मिरगे मो न.9834609049 सुरेश गोंड, पांडुरंग म्हस्के मो न. 9763048256 निवृत्ती कळमकार विष्णू कवडकर सचिन अतकरे प्रमोद येऊन महादेव हिस्सल प्रकाश दंडे संतोष राऊत लिलाबाई कोथळकर मो न.9673536197 निलेश काचकुरे मंगेश बावस्कर प्रवीण बार पाटील संतोष मानेकर यांच्याकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




