जळगांव जामोद – (अनिल हेलोडे ) –सद्या जळगाव जामोद तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान प्रत्येक गावामध्ये राबवणे सुरू असून त्याचाच भाग म्हणून ग्रामपंचायत निंबोरा बु व जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा निंभोरा बुद्रुक यांचे संयुक्त विद्यमाने निंभोरा बुद्रुक येथे येथे मुख्याध्यापक शिक्षक वृंद गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व त्यांचे सदस्य यांचे माध्यमातून लोक सहभाग व लोक वर्गणी मधून निर्माण केलेल्या शालेय क्रीडांगणाचे उत्साहाच्या वातावरणात जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीपकुमार मोरे यांच्या हस्ते अगदी थाटात उद्घाटन पार पडले.
दिनांक 3 डिसेंबर २०२५ रोजी श्री भीमानंद तायडे यांनी मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेतला व या अगदी कमी कालावधीत गावच्या बाहेर अक्षरशः घनदाट जंगल असलेल्या नदी काठावरील जवळपास 30 गुंठे जमिनीवर भव्य शालेय क्रीडांगण निर्मितीचे काम पूर्णत्वास नेले.गावातील काही दानदाते व स्वतः आर्थिक झळ सहन करत मु अ भीमानंद तायडे व त्यांची टीम यांनी रात्रंदिवस मेहनत करत सुंदर अशा क्रीडांगणाची निर्मिती केली. यात क्रीडांगण साफसफाई, कंपाउंड जाळी व गेट इत्यादी कामे फारच कमी कालावधीत पूर्ण केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मु अ तायडे सर यांनी प्रशिक्षित केलेल्या विद्यार्थ्यांनी लेझीमनृत्याने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.नंतर गावाच्या प्रथम नागरिक सरपंचा सौ रेखाताई चव्हाण व जळगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी संदीप मोरे यांनी फित कापून शालेय क्रीडांगणाचे लोकार्पण केले. गावातील सर्व क्रीडांगण निर्मितीसाठी मदत करणारे तथा आर्थिक मदत करणारे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन गट विकास अधिकारी यांनी स्वागत केले. शासनाने तसेच नेहरू युवा केंद्र बुलडाणा यांनी दिलेल्या खेळसाहित्याचा व या क्रीडांगणाचा शालेय विद्यार्थ्यांसह गावातील युवकांनी सुद्धा खेळण्यासाठी उपयोग करून घ्यावा तसेच या क्रीडांगणाचा विद्यार्थ्यांच्या मानसिक,बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकासासाठी उपयोग होईल असे उद्गार उद्घाटक गटविकास अधिकारी मोरे यांनी काढले व मुख्याध्यापक श्री तायडे सर व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडांगणावर वृक्षारोपण होऊन सह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रसंगी जळगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी शिक्षण विस्तार अधिकारी श्री व्यवहारे साहेब, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ भारतीताई वाघ, ग्रामसेवक श्री देशमुख,पोलीस पाटील डॉ उगले साहेब, जि प केंद्रीय शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री म्हसाळ सर,केंद्रप्रमुख योगेश वाघ,सुनील हागे, ढोले सर राजेंद्र ससाणे एक्सप्रेस न्युज भारत चे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी , मनोज सनानसे पोलीस टाईम ट्वेंटी न्यूज चे जिल्हा प्रतिनिधी,सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर,रोजगार सेवक व सर्व विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उस्थित होते.
दरम्यान आम्ही या क्रीडांगणावर विविध कार्यक्रमआयोजित करू तसेच हे क्रीडांगण वृक्षारोपण करून हिरवेगार करु,अशी आभार मानताना मु अ श्री तायडे सर यांनी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक श्री चितोडे सर, श्री खारोडे सर, श्री काकडे सर शाळा व्यवस्थापन समिती व सर्व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.तर वृक्ष पुरवठा ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी गणेश देशमुख यांनी केला



