ज
जळगाव जा:-
बुलढाणा जिल्ह्यातील
जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भालांजन गावाशेजारी असलेल्या विहिरीत एकाच कुटुंबातील पाच व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने जिल्हा भर खळबळ उडाली आहे…
पत्नीला माहेरी पाठवून आपल्या दोन मुलं व दोन मुलींना विहिरीत ढकलून स्वत:ही आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जळगाव जामोद तालुक्यात २५ में रोजी सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या प्राप्त माहितीवरून विजय मुसा किराडीया या आदिवासी व्यक्तीचे आपल्या पत्नीसोबत काहितरी किरकोळ वाद झाला त्यामुळे पत्नीला माहेरी पाठवून आपल्या प्रीत विजय किराडिया वय सात वर्ष,प्राची विजय किराडिया वय पाच वर्ष, पुर्वी विजय किरडिया चार वर्ष ,पियुष विजय किराडिया वय दोन वर्षे या आपल्या चार मुलांना पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत टाकून दिले व स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली…
घटनास्थळी पोलिस फॉरेन सेक्स दाखल झाले असून सर्व मृतदेहांचे मृतदेह ताब्यात घेऊन जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात सर्वविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
पुढील तपास एस.डी.पी.ओ.महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील व त्याचे सहकारी करत आहे.
