जळगांव जामोद – (अनिल हेलोडे ) – जळगांव जामोद शहरात आमदार संजय भाऊ कुटे यांच्या घरासमोरून बिबट्या जात असल्याचे सि . सि. टिव्ही कॅमेऱ्यात रात्री दिसुन आले . आज सकाळी बिबट्या एका शाळेमध्ये असल्याची चर्चा जळगांव शहरात पसरल्याने नागरीकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . प्रशासन युद्ध पातळीवर बिबटयाचा शोध घेत आहे . नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात येत आहे .

