जळगांव जामोद – स्थानिक राजपुतपुरा येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ . शोभाताई राजपुत यांची शिवसेना शिंदेगट राज्य ग्रंथालय सेल महीला बुलडाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली . ही निवड दि. २० / ०४ / २०२६ रोजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवन मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली . या वेळी शोभाताई राजपुत यांना श्री . प्रशांत खंडागळे सचीव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी राज्य ग्रंथालय सेल महिला राज्य उपाध्यक्षा सौ . विजयाताई भारती यांच्या उपस्थितीत त्यांना गौरविन्यात आले शोभाताई राजपुत यांनी घरेलू कामगार महीला . विधवा महिला परितक्त्या महिला यांना वेळो वेळी सहकार्य करून त्यांची महत्वाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले . त्यांचे कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हाध्यक्ष हे महत्वाचे पद देन्यात आले . मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते .
